योग असा तर खूप गहन विषय पण दैनंदिन जीवनात उतरविला तर अगदी सहज नि सोपा.
योग म्हणजे फक्त एकाच ठिकाणी ध्यानस्थ बसणे, आसन करताना स्वतः चे पाय स्वतः च्या गळ्यात ( स्वतः च्याच गळ्यात हो दुसऱ्यांच्या नाही ) अडकवणे किंवा प्राणायाम द्वारे श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच योग नाही तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधि या आठ अंगांचा सुरेख संगम म्हणजे योग .. आयुष्य उत्साहपूर्ण, आनंदाने जगण्याची कला म्हणजे योग ..
योगिक जीवनशैली आत्मसात केल्यास मन सतत प्रफुल्लित नि आनंदी रहाते .. योगासनं केल्यानं आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम तर होतोच पण आजच्या अंत्यंत वेगवान जीवनशैलीमुळे आलेले ताणतणाव ही दूर होतात, नैराश्य कमी होऊन मानसिक ऊर्जा विकसित होते ..
आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली वावरत आहे, मग तो तुमच्या, माझ्या सारखा सामान्य माणूस असो कि देशाचा पंतप्रधान !! जिथे प्रत्येकाला श्र्वास घेण्यासाठी ही वेळ नाही, तिथे काही क्षण स्वतःसाठी काढणे खूपच गरजचे झाले आहे आणि म्हणूनच अश्या व्यग्रतेत सुद्धा योगाभ्यास केल्याने शरीर व मन निरोगी ठेवण्यास मदत तर होतेच त्याचबरोबर सर्व शारीरिक आणि मानसिक आजारांना दूर ठेवणं ही सहज शक्य होते.
इतकंच नाही तर नित्यनेमाने योगाभ्यासाचा प्रत्येकाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. जीवन सहज, सोपे, सुंदर आहे हे योगाभ्यासामुळे कळायला नि वळायलाही लागते ..
गरच आहे ती फक्त सुरुवात करायची, एक पाऊल पुढे टाकायची .. मग आहात ना तयार सहज सुंदर जीवन जगायला, तर करा सुरुवात ..
"मन करा रे प्रसन्न .. करून योगासन .."
Love and Peace
🧘🏻♀️💗🕊️💗🧘🏻♀️
MindsouL YoG
©creatorprachi